Saturday, 15 February 2025

मॅरेथॉन


आजवरची पहिली मॅरेथॉन, ती सुद्धा आजारपणातून बाहेर पडल्यावर धावायचं ठरवलं तेव्हा डॉक्टर पासून घरच्यांपर्यंत सगळ्यांनी "पुन्हा एकदा विचार कर बाबा" असं सुचवलं.
पण स्वतःला एकदा टेस्ट करून बघायचंच हे ठरवूनच ठेवलं होतं. अर्थात ह्याआधी कधीच मॅरेथॉन धावलो नसल्याने, त्यात आजारात चालणं, धावणं बऱ्यापैकी कमी, नाहीच म्हणा ना, झालं असल्याने मी धावू शकेन का ही चिंता सतावत होतीच.
शेवटी आत्ता 5 किलोमीटर चा ऑप्शन निवडला. नोंदणी पण अगदी शुक्रवारी केल्यामुळे प्रॅक्टिस अशी काहीही केली नव्हती. पण आज सकाळी ग्राउंड वर पोचल्यावर तिथे बऱ्यापैकी वॉर्म अप झाला.
तिथे आलेले बरेच जण नेहमी धावणारे होते. त्यांना बघून उत्साह वाढला ही मात्र नक्की.
Flag off झाल्यानंतर पहिले 200 मीटर होईपर्यंतच हवा टाईट होऊन गेली. पण 5 किलो मीटर पूर्ण करायचे म्हणजे करायचे हे मनाशी ठरवूनच आलो होतो. अडीच किलोमीटर वर यू टर्न होता. तिथपर्यंत सलग धावलो. यू टर्न नंतर मात्र थोडा चाललो. दम बऱ्यापैकी लागला होता. रस्त्यात काही झालं तर सावरायला, घेऊन जायला आयोजकांच्या गाड्या होत्या. पण अर्धवट सोडायचं नाही ह्याची मनाशी खुणगाठ बांधून ठेवली असल्याने पुन्हा धावायला सुरुवात केली.
शेवटच्या 500 मीटर मधे मात्र आता फायनल लाइन येऊ दे बाबा लवकर असं वाटू लागलं होतं. शेवटी एकदा फायनल लाइन क्रॉस केली आणि हुश्श केलं.
साधारण 39 मिनिटे लागली 5 किलोमीटर पूर्ण करायला.
नेहमी धावणाऱ्यांसाठी कदाचित ही वेळ खूप जास्त असू शकेल. पण आज माझ्यासाठी ही खूप मोठी कामगिरी होती. अजून पुढे धावेन तेव्हा नक्कीच ह्याहून कमी वेळ लागेल. पण आज सुरुवात झालीय.
RD 2.0 मधे एक एक गोष्टी achieve करत चाललो आहे. त्या लिस्ट मध्ये अजून एक गोष्ट आली - मॅरेथॉन.
बघू, पुढे लवकरच अजून एखादी मॅरेथॉन, कदाचित जास्त अंतर आणि कमी वेळ असं पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन.
तोपर्यंत Stay Fit, Stay Positive


राजेंद्र देशपांडे

#nashik #marathon #firstrun #running #MarathonRunning 


No comments:

Post a Comment