🚩 भाग एक🚩
काही दिवसांपूर्वी धारावी मध्ये कोरोना चा जवळपास नायनाट अशा बातम्या आल्या. तिथे मुख्यत्वे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काम केल्याचं पाहून समाधान वाटलं होतं. पण त्यानंतर आलेल्या बातम्या/सोशल मीडिया वरच्या पोस्ट्स वर त्याला विरोध झाला, की संघाने तिथे काही कामच नाही केलं आहे, वगैरे. स्वतः काहीही न करणाऱ्या संघटना/लोकं ,इतकं मोठं काम करूनही त्या संघाला दूषणं देण्यासाठी मात्र समोर सरसावतात, ते वाचून थोडी नाराजी होती मनात. परंतु अंदाजे 14 किंवा 15 जुलै चा दिवसाने सगळं विचारचक्र पालटून टाकलं.
माझा (फेसबुक) मित्र अमेय गोखले ह्याने एक पोस्ट टाकली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित कोविड चाचणी मोहिमेत तो सहभागी झाला होता. त्याने पुढच्या 2-3 दिवसात त्याचे अनुभव शेअर केले होते.
ते वाचून डोक्यात सुरू झालं की आता आपण सुद्धा ह्या मोहिमेत सहभागी व्हायचंच.
माझ्या शेजारी राहणारे श्री. अजित टिपरे काका ह्यांच्या कानावर मी माझ्या मनातलं सांगितलं, त्यांनी मला श्री मनोज कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून दिला.
शुक्रवारी 24 जुलै ला सायंकाळी मी मनोजजींना फोनवर विचारलं की माझी इच्छा आहे संघाच्या कोरोना संबंधित कोणत्याही मोहिमेत सहभागी होण्याची.
मला ते इतकंच म्हणाले, उद्या सकाळी 7 वाजता तयार रहा.
ठरल्याप्रमाणे शनिवार 25 जुलै सकाळी मी त्यांना भेटून आम्ही निघालो.
कैलास मठ-भक्ती धाम, नाशिक येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती चे कार्यकर्ते जमले होते. आज कोरोना चाचणी मोहीम सुरू होणार होती.
मनोजजींनी मला सांगितलं की तू आज इथे व्यवस्था विभागात काम कर. संघाच्या ह्या पवित्र कामात आपला हातभार कोणत्या ना कोणत्या रुपात लागतोय हे माझ्या साठी भाग्याचं होतं. लागलीच इतर स्वयंसेवकांसोबत कामाला लागलो. काम करता करता बोलणं व्हायचं तशी ओळख होत होती. ज्या टिम्स सकाळी कोरोना चाचणी मोहिमेसाठी जाणार होत्या त्याचे किट रेडी करायची जबाबदारी अमही तिघांवर होती. PPE किट, ग्लोव्हज(PPE किट सोबत एक जोडी असतेच पण तरीही प्रत्येकाला 2 जोड्या extra ठेवत होतो) , फेस शिल्ड, सॅनिटायझर ची बाटली, ऑक्झिमीटर आणि टेम्परेचर मोजणारी गन, असे सेट व्यवस्थित रेडी करून ठेवले होते.
टिम्स जशा येऊ लागल्या तस आम्ही एक एक सेट देत होतो.
प्रत्येकाला त्याबद्दल पूर्ण माहिती सांगितली जाते होती.
7 टिम्स झल्या नंतर लक्षात आलं की 8 व्या टीम मध्ये सदस्य कमी आहेत. एका टीम मध्ये 4 सदस्य अशी रचना होती परंतु काही कारणांमुळे ते दोघे येऊ शकले नव्हते.
हे सगळं सुरू असताना अचानक कानावर पडलं, "कोणी जाऊ शकतंय का स्क्रिनिंग साठी, 8 नंबर टीम सोबत"
मी क्षणात त्या आवाजाच्या दिशेने गेलो- जयेश जी होते, त्यांना म्हटलं, मला जायचं आहे.
ते म्हणाले, तिकडे नाव नोंदणी कर, तुमचं PPE किट घ्या आणि सुरू करा मोहीम.
उड्या मारत काउंटर वर गेलो, तिथे श्रीपाद उभा होता, तो ही माझ्यासारखाच व्यवस्था साठी आलेला, पण टीम मध्ये एक जण कमी पडतोय म्हणून फिल्ड वर जाण्याची इच्छा, म्हणून नाव लिहीत होता.
पुढच्या 15 मिनिटात सर्व सोपस्कार पार पाडून आम्हाला आमचे PPE किट मिळाले.
सर्व सूचना पुन्हा पुन्हा सांगण्यात आल्या.
PPE किट अंगावर चढवणं हा मोठा टास्क आहे. आजवर फक्त फोटो मध्ये बघितलेले PPE किट आता आपण स्वतः घालणार आहोत, हा विचारच भन्नाट होता.
तो जम्प सूट, फेसशील्ड, आणि मग त्याच मटेरियल चे बूट घालून आम्ही अंतराळवीर तयार झालो.
एक एक करत टीम कामगिरीवर निघत होत्या.
"टीम क्रमांक 8 रेडी आहेत का?" असा जयेशजींचा आवाज येताच आम्ही चौघे म्हणजेच मी-राजेंद्र देशपांडे, श्रीपाद चंद्रात्रे, निनाद कुलकर्णी आणि शुभम महाले असे चौघे अंतराळवीर निघालो.
बाहेर एक इनोव्हा उभी होती. ती गाडी आम्हाला आमच्या चाचणी साठी नेमून दिलेल्या गल्लीपर्यंत आमच्या सोबत होती. एक स्थानिक कार्यकर्ता सोबत होता, ज्याने आम्हाला कोणकोणत्या गल्ल्यांतून आम्ही स्क्रिनिंग करायचं आहे ते सांगितलं आणि आमची मोहीम सुरू झाली...
क्रमशः:
राजेंद्र खूप छान निर्णय. ऐनवेळी ठरवूनही ताबडतोब स्क्रीनिंग कामासाठीही पुढे जाण्याचा घेतलेला निर्णय आयुष्याची नवीन बाजू शिकवणार आहे. समाजाप्रती आपलं देणं आहे ह्याची जाणीव असली तरी कोणाच्या तरी मागे हीच सर्वसामान्य भूमिका असते. पण आजोबानी आपल्याला दिलेल्या शिकवणीला तू हि पुरेपूर पळून सर्वाना मदत प्रथम, राष्ट्र प्रथम हि भूमिका पाळलीस. खूप अभिमान आहे.
ReplyDeleteअसाच लिहिता हो. सर्वां पर्यंत ह्या गोष्टीचे गांभीर्य व महत्व जाण्यासाठी लिहिते होणे हाच मार्ग आहे. आणि आधी केले मग सांगितले हा आपला स्थायीभाव.
तरीही सर्व काळजी घ्या . इतरांनाही काळजी घ्यायला लावा. त्यासाठी शक्य ती मदत करा.
अतिशय कौतुकास्पद आणि प्रेरणादायी कार्य!
ReplyDelete