ब्लॉग..... आता जुना झालेला शब्द. पण आज मला मात्र याच शब्दाचे जाम अप्रूप वाटतंय.
कारण, आज पर्यंत खूप लोकांनी ब्लॉग लिहिले, वाचले. मी ही वाचले. पण आत्ता लिहावासा वाटला.
अर्थात ब्लॉग लिहिणे ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाहीये.
पण पहिली कार, पहिली बाईक, पहिला फोन, पहिले प्रेम, शाळेचा पहिला दिवस, कॉलेजचा पहिला दिवस, पहिली मुलाखत, आणि बराच काही,
या प्रत्येक घटनेच्या वेळी जो आनंद आपल्या चेहऱ्यावर असतो, ज्या भावना मनात दाटून येतात, अगदी तसंच आत्ताही होतंय.
ब्लॉग लिहिण्याचं कारण तसा कॉमनच ...
आपल्या मतांना एक व्यासपीठ मिळणे, लोकांपर्यंत आपला म्हणणं पोचवणे.
बघूया जमतंय का ब्लॉग लिहिणं... प्रयत्न करायला तर काहीच हरकत नाही....
सुरुवात तर केलीय...
No comments:
Post a Comment